जळकोट येथे 21 मार्च रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

जळकोट येथे 21 मार्च रोजी

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन   

लातूर,दि.18: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मॉडेल करिअर सेंटर व जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 21 मार्च, 2025 रोजी सकाळी 10 वाजता जळकोट येथील पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संभाजीराव केंद्रे महाविद्यालय येथे हा रोजगार मेळावा होईल. 

या रोजगार मेळाव्यात रोजगार देणारे एकूण 10 पेक्षा जास्त आस्थापना, उद्योजक यांनी 270 रिक्तपदे अधिसुचित केली आहेत. यामध्ये ग्लोबल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी मशिन ऑपरेटर, सीएनसी-व्हीएनसी ऑपरेटर, (50 जागा, पात्रता, दहावी, बारावी, कोणतीही पदवी, आय टी आय,डिप्लोमा सर्व ट्रेड),  बारस्कर सर्व्हिसेस ॲन्ड सप्लायर्स इंडिया प्रा.लि. पुणे यांनी ऑपरेटर, सीएनसी ऑपरेटर, ट्रेनी ( 50 जागा, पात्रता, दहावी, बारावी, कोणतीही पदवी, आय टी आय, डिप्लोमा सर्व ट्रेड). चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा.लि.पुणे यांनी कस्टमर रिलेशनशिप एक्झिकेटिव्ह, (50 जागा, पात्रता, दहावी, बारावी, कोणतीही पदवी). आय.टी.एम. स्कील अकॅडमी, (आय.सी.आय.सी.आय.बँक) नांदेड यांनी रिलेशनशिप मॅनेजर (20 जागा, पात्रता, कोणतीही पदवी), तिरूमला फॅसिलीटी पुणे  यांनी ट्रेनी (20 जागा, पात्रता, आयटीआय सर्व ट्रेड).  टॅलेंट सेतू प्रा.लि.पुणे यांनी ट्रेनी                                (20 जागा, पात्रता, आय टी आय, डिप्लोमा सर्व ट्रेड). मुथुट मायक्रोफिन प्रा.लि. यांनी रिलेशनशिप ऑफिसर, फिल्ड ऑफिसर (20 जागा, पात्रता बारावी, कोणतीही पदवी),  क्रेडिट ॲक्सीस ग्रामिण लि.(उदगीर शाखा) यांनी रिलेशनशिप ऑफिसर (10 जागा, पात्रता कोणतीही पदवी), एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स (उदगीर शाखा) यांनी लाईफ मित्रा, (15 जागा, पात्रता, दहावी, बारावी, कोणतीही पदवी). लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (उदगीर शाखा) यांनी एलआयसी ऍडवाझर (15 जागा, पात्रता, दहावी, बारावी, कोणतीही पदवी) आदी पदे अधिसूचित केली आहेत.

सर्व नामांकीत कंपनीतील उद्योजकांची रिक्तपदे निहाय इच्छूक उमेदवारांनी 21 मार्च, 2025 रोजी सकाळी 10 वाजता जळकोट येथील संभाजीराव केंद्रे महाविद्यालय येथे स्वखर्चाने मुलाखतीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटो इ. (पाच प्रती) सह उपस्थित रहावे. लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे अवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र लातूर या कार्यालयाच्या 02382- 299462 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.                        

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन