लातुरात 20 मार्चपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन

 

लातुरात 20 मार्चपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन

लातूर,दि.18: राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व लातूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने लातूरच्या कम्युनिटी हॉल, (आदर्श कॉलनी) येथे गुरुवार,                   २० व शुक्रवार, २१ मार्च २०२५ रोजी "लातूर ग्रंथोत्सव २०२४" चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी वंदना सु. काटकर यांनी दिली.

या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, राज्याचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, माजी कुलगुरु डॉ. जनार्धन वाघमारे, छत्रपती संभाजीनगरचे सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाह राम मेकले, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे यांची उपस्थिती राहणार आहे.  

गुरुवारी सकाळी ८ वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथून ग्रंथदिंडी निघेल. या ग्रंथदिंडीचे लातूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांच्या हस्ते होईल. दुपारी २ ते ४ वाजता "आपला मान, आपला स्वाभिमान भारतीय संविधान" या विषयावर परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार हे राहणार असून प्रमुख वक्ते म्हणून भूषणकुमार जोरगुलवार, राजशेखर सोलापुरे, विलास सिंदगीकर यांचा सहभाग राहील. दुपारी ४ ते ६ वाजता जेष्ठ कवी व वात्रटिकाकार भारत सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे.

शुक्रवार, २१ मार्च २०२५ रोजी सकाळी १०.३० ते ११ वाजता साहित्यिक अनंत कदम यांच्या अध्यक्षतेखाली ‘मला आवडलेले पुस्तक’ या विषयावर शालेय विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजता जेष्ठ कादंबरीकार डॉ. शेषेराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली  ‘माझी मराठी अभिजात मराठी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये प्रदीप नणंदकर, योगिराज माने, ज्ञानदेव राऊत, अनीता येलमटे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी २ ते ३.३० वाजता प्राचार्य सोमनाथ रोडे यांच्या अध्यक्षतेखाली " लातूरची साहित्य संस्कृती" या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे.  या कार्यक्रमामध्ये जयप्रकाश दगडे, डॉ. जयद्रथ जाधव, विवेक सौताडेकर, धंनजय गुडसुरकर यांचा सहभाग राहणार आहे. सायंकाळी ४ ते ५.३० वाजता ‘ग्रंथोत्सव-२०२४’ चा समारोप होणार आहे. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी साहित्य समीक्षक डॉ. सूर्यनारायण रणसुभे सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती उज्वला पाटील, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (योजना) लातूर श्रीमती तृप्ती अंधारे यांची यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

या ग्रंथोत्सवात लातूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, ग्रंथपाल, कर्मचारी व ग्रंथप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समिती व ग्रंथोत्सव संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन