ई-रिक्षासाठी सवलतीच्या दरात मिळणार अर्थसहाय्य

 

ई-रिक्षासाठी सवलतीच्या दरात मिळणार अर्थसहाय्य

लातूर, दि. 5 (जिमाका) : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातंर्गत जिल्हा उद्योग केंद्र आणि राजयोग बजाज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व बजाज शोरुममध्ये ई-रिक्षाचे वितरण योजनेतंर्गत राष्ट्रीयकृत बँकामार्फत कर्ज स्वरुपात देण्यात येत आहे. जिल्हा उद्योग केंद्र आणि जिल्ह्यातील सर्व बजाज शोरुमध्ये याबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातंर्गत सुशिक्षित बेरोजगारांसाठी पुरुष, महिला, महिला बचत गटासाठी बजाज कंपनीतर्फे सवलतीच्या माध्यमातून अर्थसहाय्य करुन देण्यात येत आहे. याबाबत लातूर जिल्हा उद्योग केंद्र येथील मोबाईल क्रमांक 9370163360 वर संपर्क साधावा अथवा प्रत्यक्ष भेट देवून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांनी केले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन