रमजान ईद निमित्त 31 मार्च रोजी जिल्ह्यात मद्यविक्री बंद
रमजान
ईद निमित्त 31 मार्च रोजी जिल्ह्यात मद्यविक्री बंद
लातूर,दि.27,(जिमाका):- जिल्ह्यात 31 मार्च, 2025 रोजी (एक दिवस पुढे मागे चंद्र दर्शनानुसार)
मुस्लिम बांधवातर्फे रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त लातूर जिल्ह्यातील
सर्व किरकोळ अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी वर्षा
ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. मुंबई मद्य निषेध
कायदा 1949 चे कलम 142 नुसार तसेच नमुद कायद्यांतर्गत केलेल्या विविध नियमानुसार प्रदान
केलेल्या अधिकाराचा वापर करुन हे आदेश निर्गमित
करण्यात आले आहेत.
या आदेशाची सर्व किरकोळ मद्यविक्री अबकारी
अनज्ञप्तीधारकांनी पालन करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्तीधारक
यांच्या विरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 व अनुषंगिक नियमांच्या आधारे कडक कारवाई
करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.
****
Comments
Post a Comment