भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे महा-आयटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. 15 मार्च 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे महा-आयटी पोर्टलवर

ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. 15 मार्च 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ

लातूर, दि. 5 (जिमाका) : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृह तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी http://hams.mahait.org हे नवीन ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवर

ज्युनिअर व्यावसायिक, बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमाचे नवीन व नुतनीकरणाचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी 15 मार्च, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तथापि, स्वाधार योजनेची तालुकास्तरावर व्याप्ती वाढल्याने तसेच ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी स्वाधार योजनेपासून वंचित राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज                 15 मार्च 2025 रोजीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यास पुणे समाज कल्याण आयुक्तालय आयुक्त यांच्या  कार्यालयाकडून पुनश्चः मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

तसेच सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ज्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी http://hams.mahait.org या पोर्टलवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे नवीन व नूतनीकरणाचे अर्ज भरलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी आधार संलग्न असलेली बँक खाते तपशिलाची माहिती भरण्याचा टॅब उपलब्ध झालेला असून सर्व नवीन व नूतनीकरणास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी बँक तपशिलाची माहिती स्वतःच्या लॉगीनमध्ये तातडीने भरावी, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी आवाहन केले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

विशेष लेख मराठी भाषेचे संवर्धन आणि आपली जबाबदारी

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन