जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.पोले यांच्या हस्ते ध्वजारोहण


 लातूर,दि.17: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या हस्ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या प्रांगणात  सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नारायण उबाळे,उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे,जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव,जिल्हा नियोजन अधिकारी एस.बी.कोलगणे,जिल्हा उपनिवडणूक अधिकारी प्रताप काळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील  अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
जुने जिल्हाधिकारी कार्यालय इमारत परिसरात ध्वजाराहेण
 येथील शिवाजी चौक परिसरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय इमारत व मध्यवर्ती प्रशासकीय इमारत  परिसरात अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर यांच्या हस्ते सकाळी 8.20 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी श्री.विधाते, समाज कल्याणचे शिवकांत चिर्कुते, वरिष्ठ भुवैज्ञानिक श्री.शेख, उपसंचालक सामाजिक वनीकरण  सुर्वणा माने यांच्यासह महसूल व प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत