सेवा संकल्प अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
लातूर, दि. ३० : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 'सेवा संकल्प अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, स्वच्छतेची सवय, व्यसनमुक्ती तसेच सर्जनशीलता आणि सामाजिक बांधीलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या अभियानांतर्गत ३० सप्टेंबर २०२६ रोजी 'माझ्या स्वप्नातील भारत तथा विकसित भारत २०४७' या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील २ हजार १३२ शाळांमधील १ लाख ५३ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये लातूर तालुक्यातील २७८ शाळांमधील ३६,२३५ विद्यार्थी, औसा तालुक्यातील २१३ शाळांमधील २,१४५ विद्यार्थी, निलंगा तालुक्यातील १८६ शाळांमधील १,८६५ विद्यार्थी, देवणी तालुक्यातील १०२ शाळांमधील ७५६ विद्यार्थी, उदगीर तालुक्यातील २८४ शाळांमधील २,४५६ विद्यार्थी, जळकोट तालुक्यातील १०७ शाळांमधील ७०५ विद्यार्थी, चाकूर तालुक्यातील १६५ शाळांमध...