निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत

 निलंगा तालुका सहाय्यक निबंधक

सहकारी संस्था कार्यालय स्थलांतरीत

लातूर, दि. 26 (जिमाका):  निलंगा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हे कार्यालय मागील 25 वर्षापासून शेटकार बिल्डींग पहिला मजला , दत्तानगर निलंगा येथे कार्यरत आहे. हे कार्यालय 1 एप्रिल, 2025 पासून डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-ऑप बँक लि. निलंगा (अवसायनात) शिवाजी चौक , लातूर रोड ता. निलंगा येथे स्थलांतरीत होणार आहे.

तरी 1 एप्रिल 2025 पासून कार्यालयाचा पत्ता सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ता. निलंगा द्वारा डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, अर्बन को-ऑप बँक लि. निलंगा (अवसायनात) शिवाजी चौक, लातूर रोड ता. निलंगा जि. लातूर असा राहील, असे निलंगा सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एन.एस. किलचे यांनी कळविले आहे.

**** 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत