जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.पोले यांच्या हस्ते ध्वजारोहण

          लातूर, दि. 26 : भारतीय प्रजास्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांच्या हस्ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या प्रांगणात आज सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. तर अपर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदकर यांच्या हस्ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी 8.20 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

        यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.) अनंत गव्हाणे, जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव, उप जिल्हानिवडणूक अधिकारी प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) भाऊसाहेब जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे यांच्यासह महसूल व इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी- कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत