खाजगी उद्योग कारखाने कंपन्यातील
कर्मचाऱ्यांना रोटेशन पध्दत लागू
*वर्क फॉर होम करण्याचे निर्देश

लातूर,दि.20:- शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. याबाबतची नियमावलीही तयार करण्यात आली असून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जी. श्रीकांत यांनी कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लातूर जिल्हयातील खाजगी उद्योग आस्थापना/ कारखाने/ कंपन्या मध्ये काम करणारे कर्मचारी पैकी एका दिवसात 50 टक्के कर्मचारी व दुसऱ्या दिवशी उर्वरित 50 टक्के कर्मचारी (रोटेशन पध्दत ) कामकाज करण्याबाबत संबंधित खाजगी उद्योग आस्थापना यांनी आवश्यक ती कार्यवाही करणेसाठी याव्दारे आदेशित करीत आहे. तसेच जे कर्मचारी Work from Home करु शकतात त्यांचे त्यांच्याकडून त्यांना  Work from Home च्या सूचना देण्यात याव्यात. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, असे ही आदेशात नमूद केले आहे.
                                         *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत