मतदार जागृतीसाठी सोमवारी जिल्ह्याभर रॅलीचे आयोजन

 

मतदार जागृतीसाठी सोमवारी जिल्ह्याभर रॅलीचे आयोजन

·         एकाच दिवशी सकाळी ८ वाजता जिल्ह्यात होणार मतदानाचा जागर

लातूर, दि. 06 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवार, 8 मार्च 2024 रोजी सकाळी 8 वाजता जिल्ह्यामध्ये गाव ते जिल्हास्तरावर मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद, महानगरपालिका, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपालिका व नगरपंचायत, महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आदी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यामध्ये सहभागी होणार असून एकाच दिवशी, एकाच वेळी जिल्ह्याभर मतदार जनजागृतीसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास