लातूर येथे 9 ऑगस्टपासून तीन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन
▪️ सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश
▪️राज्यातील नामांकित कलाकारांचे सादरीकरण
▪️सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजन
लातूर , 07 : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025 चा लोकसंगीत महोत्सव 9 ते 11 ऑगस्ट, 2025 या कालावधीत लातूर येथील दयानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवात राज्यातील विविध गायक कलाकार व कलापथक आपली कला सादर करणार आहेत. शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी रामानंद उगले, श्रावणी महाजन, विनल देशमुख, कुणाल वराळे यांच्यासह सहकलाकार हे आपली कला सादर करणार आहेत, तर रविवार, 10 ऑगस्ट, 2025 रोजी चैतन्य कुलकर्णी, आसावरी बोधनकर, प्रतीक सोळसे, अनुष्का शिकतोडे यांच्यासह सहकलाकार हे आपली कला सादर करतील. या महोत्सवाचा समारोप सोमवार, 11 ऑगस्ट, 2025 रोजी होणार असून अपेक्षा घारे, राधा खुडे, अभिजित कोसंबी, गौरव पवार यांच्यासह सहकलाकार आपली कला सादर करणार आहेत.
हा लोकसंगीत महोत्सव सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभिषण चवरे यांनी केले आहे.
***
मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन लातूर, दि. १६ : मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी संबंधित व्यक्ती व संस्थांनी 'राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म' (एनएफडीपी) पोर्टलवर आपली नोंदणी करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती तेजस्विनी सिंधू प्रदीप करळे यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व वैयक्तिक मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्य विक्रेते, मच्छिमार सहकारी संस्थांचे सभासद आणि मत्स्यउत्पादन शेतकरी संघ यांना विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी या पोर्टलवर नोंदणी असणे अनिवार्य आहे. ही नोंदणी https://nfdp.dpf.gov.in किंवा https://pmmkssy.dof.gov.in या लिंकवर स्वतः किंवा जवळच्या 'सीएससी' केंद्रात जाऊन विनामूल्य करता येईल. नोंदणीसाठी ओळखपत्र आणि बँक पासबुक सोबत असणे आवश्यक आहे. यासोबतच, ई-श्रम कार्डसाठीची नोंदणी https://eshram.gov.in या लिंकवर करावी. तसेच अपघात गट विमा नोंदणीबाबतची ३३ कॉलमची माहिती आणि 'केसीसी' संदर्भातील कागद...

Comments
Post a Comment