लातूर जिल्ह्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध; टंचाई नाही

लातूर जिल्ह्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध; टंचाई नाही लातूर, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात सध्या 34 हजार 305 मे. टन रासायनिक खते उपलब्ध असून, यापैकी 546 कृषी सेवा केंद्रांमध्ये 7 हजार 17 मे. टन युरिया खत उपलब्ध आहे. यामुळे जिल्ह्यात खतांची टंचाई नाही. शेतकऱ्यांना खतसाठ्याची माहिती https://adozplatur.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html?m=1 या ब्लॉगवर दररोज अद्ययावत केली जाते. सोयाबीन पिकाचे जिल्ह्यात 4 लाख 85 हजार 182 हेक्टर क्षेत्र असून, हे पीक फुले लागणे ते शेंगा भरणे अवस्थेत आहे, त्यामुळे युरियाची गरज नाही. युरियाच्या वाढीव दराने विक्री किंवा टंचाईबाबत कोणतीही लिखित तक्रार नाही. जिल्ह्यात 713 कृषी सेवा केंद्रांची निरीक्षकांमार्फत तपासणी झाली असून, अनियमितता आढळलेल्या 15 दुकानांचे परवाने काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहेत. तसेच एका दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. वाढीव दराने विक्री किंवा सक्तीच्या लिंकिंगच्या तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत