Posts

Showing posts from November, 2026

लातूर जिल्ह्यात ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये बालसुरक्षा व बालहक्काबाबत प्रबोधन

Image
लातूर जिल्ह्यात ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये बालसुरक्षा व बालहक्काबाबत प्रबोधन लातूर, दि. ०३ : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार आणि लातूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष संजय भारुका यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण, बालहक्कांची जाणीव आणि सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात 'सुरक्षित बचपन अभियान' अंतर्गत 'बचपन बचाव' अभियान राबविण्यात आले. लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शिक्षण विभाग आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान आयोजित या अभियानाची सुरुवात दिनांक २८ ऑक्टोबर रोजी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे कायदेविषयक शिक्षण शिबिराने झाली. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या देशव्यापी सुरक्षित बचपन अभियानाच्या अनुषंगाने आणि 'जागरूकता, सुरक्षा आणि संरक्षण-हर बच्चे का अधिकार' या मुख्य संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ...

लातूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १९ लाखांहून अधिक लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

लातूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १९ लाखांहून अधिक लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त लातूर, दि. २ : राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी लातूर येथील मळवटी रोडवरील सद्गुरू नगर भागात बेकायदा गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीकरिता प्रतिबंध असलेला विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान घटनास्थळी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य ७५० मि.ली. क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या एकूण १ हजार १५२ सीलबंद बाटल्या, बनावट विदेशी मद्याच्या विविध ब्रँड्सच्या १८० मि.ली. क्षमतेच्या १२५ बाटल्या, ५ हजार ६५० नगांचे विविध ब्रँडचे बनावट बूच, मद्य वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन आणि दोन मोबाईल संच असा एकूण १७ लाख १ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ङ), (ई), ८१, ८३, ९० व १०३ अन्वये योगेश आत्माराम सांडवे (मद्य साठा मालक, रा. बालाजी मंदिर चौक, सोहेल नगर, जि. लातूर), अशोक प्रभू राजे (जागा मालक, रा. सद्गुरू नगर, मळवटी रोड, ता. जि. लातूर) या दोघांविरुद्ध गुन्हा क्रमांक ३३०/२०२६ नोंदविण्यात आ...