‘कॉपीमुक्त परीक्षा’साठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी ‘ऑन फिल्ड’
· देवणी येथील दोन परीक्षा केंद्रांची पाहणी · तोगरी येथील परीक्षा केंद्रावर सुमारे दोन तास उपस्थिती लातूर , दि. 2 7 , ( जिमाका): इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी संबंधित विभागांची बैठक घेवून यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आज देवणी, तोगरी येथील परीक्षा केंद्रांना अचानक भेट देवून पाहणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. इयत्ता दहावी , बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी परीक्षा केंद्रांवर परीक्षेआधी एक तासापासून परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका ताब्यात घेईपर्यंत महसूल विभागाचे बैठे पथक तैनात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले होते. परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात केंद्रनिहाय सुरक...