विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे यांचा 24 व 25 फेब्रुवारी रोजीचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

 

विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे यांचा

24 व 25 फेब्रुवारी रोजीचा लातूर जिल्हा दौरा कार्यक्रम

 

लातूर दि. 24 (जिमाका) :  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे हे शुक्रवार, दिनांक 24 फेब्रुवारी, 2023 व शनिवार, 25 फेब्रुवारी, 2023 या दोन दिवसांच्या कालावधीत लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाण राहील.

विधानसभेचे विरोधी पक्षनेत श्री. अंबादास दानवे हे शुक्रवार, दिनांक 24 फेब्रुवारी, 2023 रोजी सांयकाळी 6-30 वाजता ता. केज जि. बीड येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह, लातूरकडे प्रयाण करतील. सांयकाळी 7-30 वाजता शासकीय विश्रामगृह , लातूर येथे आगमन व मुक्काम.

शनिवार, दिनांक 25 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 9-15 वाजता शासकीय विश्रामगृह, लातूर येथून मोटारीने मौजे हासोरी ता. निलंगा जि. लातूरकडे प्रयाण. सकाळी 10-00 वाजता मौजे हासोरी ता. निलंगा जि. लातूर येथे भुकंप प्रवण भागास भेट व गावऱ्यांसमवेत चर्चा. सकाळी 11-00 वाजता मौजे वलांडी ता. देवणी जि. लातूर येथील पक्षीय कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1-30 वाजता शासकीय विश्रामगृह , लातूर येथे जिल्हाधिकारी , लातूर यांची भेट व चर्चा. दुपारी 2-00 वाजता शासकीय विश्रामगृह , लातूर येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 3-00 ते 5-00 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह,लातूर येथे राखीव. सांयकाळी 6-15 वाजता नवीन गुळ मार्केट, रिंग रोड, लातूर येथील संतोष सोमवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट. सायंकाळी 7-00 वाजता मौजे हेर ता. उदगीर जि. लातूर येथील पक्षीय कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8-15 वाजता मोटारीने लातूर रोड रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9-30 वाजता लातूर रोड रेल्वे स्थानक येथे आगमन व रेल्वे गाडी क्र. 22144 बिदर सी.एस.एम.टी. एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.

*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु