जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षा

ऑनलाईन अर्ज भरण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

लातूर, दि. 10 (जिमाका) : जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी अर्ज भरण्यास 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती https://navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेश परीक्षा 29 एप्रिल 2023 रोजी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर होईल.

प्रवेश अर्ज निशुल्क ऑनलाइन भरण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रथम नवोदय विद्यालय समितीच्या वेबसाइटवरील प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे. या प्रमाणपत्रावर पाचवीत शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सही शिक्का, पालकांची सही, विद्यार्थ्याची सही व फोटो असणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज  https://cbseitms.rcil.gov.in/nvs किंवा https://navodaya.gov.in या संकेतस्थळावरून भरता येईल.

इयत्ता सहावीसाठी निवड चाचणी परीक्षेस बसणारा विद्यार्थी इयत्ता तीसरी, चौथीमध्ये सलगपणे  उत्तीर्ण होऊन कोणताही खंड न पडता शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पाचवीमध्ये लातूर जिल्ह्यात शिकत असावा. त्याचा जन्म दिनांक 1 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 (दोन्ही दिवस पकडून) दरम्यानचा असावा. त्याचे पालक लातूर जिल्ह्याचेच रहिवासी असावेत, अन्यथा ते प्रवेश अर्ज भरण्यास अपात्र असतील.

इतर मागास प्रवर्गात अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांनी मार्च 2023 पूर्वी भारत सरकारचे इतर मागास प्रवर्गाचे (ओ. बी. सी.- फॉर्म नंबर 09) जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. ज्या पालकांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज भरतांना लिंग (मुलगा/मुलगी), प्रवर्ग (सामान्य/इतर मागास/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती), क्षेत्र (ग्रामीण/शहरी), दिव्यांगता आणि परीक्षेचे माध्यम चुकीचे भरले असल्यास ते दिनांक 16 फेब्रुवारी 2023 आणि 17 फेब्रुवारी 2023 रोजी संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाइन दुरुस्ती करू शकतात. दिनांक 17 फेब्रुवारी 2023 नंतर कोणताही बदल करता येणार नाही याची दक्षता घ्यावी.

अधिक माहितीसाठी लातूर जवाहर नवोदय विद्यालायचे प्रवेश परीक्षा प्रभारी बी. डी. शेख (भ्रमणध्वनी क्र. 9817834930) किंवा व्ही. एच. खिल्लारे (भ्रमणध्वनी क्र. 9860568840) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आर रामू यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा