उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळ येथे आगमन
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळ येथे आगमन
लातूर, दिनांक 09 (विमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळ येथे आज आगमन झाले. निलंगा येथील कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्मारक अनावरण कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
विमानतळ येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे,
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे,
अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे पुष्पगुच्छ
देऊन स्वागत केले. याप्रसंगी खासदार सुधाकर शृंगारे, सर्वश्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर,
रमेश कराड, अभिमन्यू पवार, माजी मंत्री विनायक पाटील आदींसह इतर मान्यवरांनी देखील
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांचे स्वागत केले.
***
Comments
Post a Comment