विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार आज जिल्ह्यात
विधानसभा विरोधी
पक्षनेते अजित पवार आज जिल्ह्यात
लातूर, दि.9 (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे
शुक्रवारी (दि. 10) लातूर जिल्हा
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. पवार यांचे 10 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठला
लातूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी दहा वाजता अहमदपूर तालुक्यातील मौजे हडोळती येथे
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची ते पाहणी
करतील. त्यानंतर अहमदपूर येथील दीपवर्षा मंगल कार्यालयात अहमदपूर व चाकूर विधानसभा
मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार व जाहीर सभा होईल.
त्यानंतर उजना येथील सिद्धी शुगर अँड इंडस्ट्रीज येथे राखीव. दुपारी 12.45 वाजता ते
शिरड शहापूर (जि. हिंगोली)कडे प्रयाण करतील.
****
Comments
Post a Comment