प्राथमिक अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकामार्फत सन 2013-14 ते सन 2020-21 चे डीसीपीएस पावत्यांचे वितरण

 

प्राथमिक अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकामार्फत

सन 2013-14 ते सन 2020-21 चे डीसीपीएस पावत्यांचे वितरण

अधिकारी, कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार


लातूर
, दि.10 (जिमाका) : नुकतेच लातूर प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक या कार्यालयाकडून लातूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सन 2013-14 ते सन 2020-21 या अर्थीक वर्षातील डीसीपीएस पावत्यांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम लातूर जिल्हा भारत स्काऊट गाईड कार्यालयात झाला. लातूर शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना फुटाणे यावेळी उपस्थित होत्या.

 


यावेळी लातूर येथील श्री व्यंकटेश प्राथमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक माधव गंगाधर मरशिवणे  यांनी डीसीपीएस कामकाजामध्ये मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी शैक्षणिक गुणवत्ता व प्रशासकीय कामकाजाविषयी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या प्रसंगी पद्मिनी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख इस्माईल कादरसाब यांनी सर्व शिक्षकांच्यावतीने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विश्वकर्मा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. नवघरे यांनी केले. प्रास्ताविक लातूर वेतन व भविष्य निर्वाह निधीचे पथक (प्राथमिक) अधीक्षक ए. ए. कदम यांनी केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी वेतन व भविष्य निर्वाह निधीचे पथक (प्राथमिक) कार्यालयातील अधिक्षक ए. ए. कदम, सहाय्यक लेखाधिकारी के. व्ही. डोलारे, कनिष्ठ लिपीक जी. बी. लवटे, कनिष्ठ लिपीक डी. एच. मुदगल, सेविका श्रीमती एस. एस. पाटील, श्रीमती पी. पी. पिटले यांनी परिश्रम घेतले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु