लातूर नेहरू युवा केंद्रामार्फत युवा नेतृत्व समुदाय विकास प्रशिक्षण शिबीर उत्साहात
लातूर नेहरू युवा केंद्रामार्फत
युवा नेतृत्व समुदाय विकास प्रशिक्षण शिबीर उत्साहात
लातूर, दि.21
(जिमाका) :
केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा
मंत्रालय अंतर्गत कार्यरत नेहरू युवा केंद्रामार्फत ग्रामीण भागातील युवकांच्या
सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. युवकांमध्ये व्यक्तिमत्व व
नेतृत्व गुण विकसीत होवून, समाजाच्या
सर्वांगीण विकासासाठी युवकांनी पुढे यावे, या उद्देशाने नेहरू युवा केंद्रामार्फत 15
ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत तीन दिवसीय निवासी युवा नेतृत्व व समुदाय विकास
प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महाराष्ट्र विद्यालय येथे करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन 15फेब्रुवारी 2023 रोजी अजित पाटील कव्हेकर
यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी ग्रामीण युवकांनी आपल्यातील
नेतृत्व गुण विकसित करून सामाजिक विकासात निस्वार्थीपणे स्वत:ला झोकून द्यावे.
तसेच समाजसेवा करत असतांना तळागाळातील व्यक्तींना नेहमी मदतीचा हात द्यावा. जेणेकरून
सामाजिक विषमता दूर होईल, अशी भावना व्यक्त केली.
तीन दिवसीय शिबिरात युवकांच्या सर्वांगीण विकासाच्या
दृष्टीकोनातुन विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्याने व चर्चासत्र आयोजित करण्यात
आली होती. राजर्षी शाहू महाविद्यालयातील प्रा. शुभम पाटील यांनी मूल्यशिक्षणाद्वारे
युवकांचे व्यक्तिमत्व विकास, दयानंद
कला महाविद्यालयातील डॉ. गोपाल बाहेती यांनी नेतृत्व विकास व रोल मॉडलिंग, जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राहुल आठवले यांनी
करिअर मार्गदर्शन व स्वयंरोजगाराच्या विविध संधी, जिल्हा
अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक कसबे यांनी स्वयंरोजगारासाठी बँकेच्या विविध योजना,
विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी
आरोग्य संवर्धानासाठी दैनंदिन जीवनशैली व आपत्कालीन वेळेतील प्राथमिक उपचार,
सायबर क्राईमचे शाखेमार्फत सायबर गुन्हे कसे घडतात त्यापासून आपले संरक्षण
कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले
भूकंप, पूर,
अपघात तसेच विविध आपत्कालीन परिस्थतीचा सामना कसा करावा, याबाबत
आपत्ती व्यवस्थापन या विषयावर स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचे
आपत्ती व्यवस्थापन प्रमुख डॉ. पी.एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. युवक मंडळाच्या
माध्यमातून ग्रामीण युवकांचा सर्वांगीण विकास या विषयावर महात्मा बसवेश्वर
महाविद्यालय समाजकार्य विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संजय गवई यांनी मार्गदर्शन
केले. योगासन, प्राणायाम च्या माध्यमातून युवकांच्या बौद्धिक,
मानसिक व शारीरिक विकास तसेच एरोबीक्सच्या माध्यमातून आरोग्य संवर्धन
यासाठी उपस्थित मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी
योगाचार्य श्री. व्यंकटेश हालींगे तसेच सागर कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
शिबिराच्या समारोपप्रसंगी उपस्थित शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे
वाटप करण्यात आले. शिबिरार्थी संध्या नंदगावे व आदित्य मोठेराव यांनी मनोगत व्यक्त
केले. जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय शिबिराचे
आयोजन करण्यात आले होते. शिबीर यशस्वी करण्यासाठी संजय ममदापुरे, प्रविण जोशी, चंद्रशेखर
पाटील, प्रशांत साबने, भिमाशंकर येळीकर,
रोहीणी पाटील, भारती पोटभरे, खुशाल बिराजदार, रविकांत गुंजीटे, अविनाश डुम्पल्ले, नवनाथ मगर, रोहीत
काळे यांनी परिश्रम घेतले.
*****
Comments
Post a Comment