अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा लातूर दौरा
अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा लातूर दौरा
लातूर, दि. 07 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड हे बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंत्री श्री. राठोड यांचे 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता तुळजापूर येथून लातूरमध्ये आगमन होईल. लातूर शहरातील रिंग रोडवरील कस्तुराई मंगल कार्यालयाशेजारील स्वानंद सभागृह येथे सायंकाळी साडेचार वाजता आयोजित बंजारा समाज सहविचार सभेस ते उपस्थित राहतील. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांचे लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. रात्री साडेदहा वाजता ते मुंबईकडे प्रयाण करतील.
*****
Comments
Post a Comment