अहमदपूर येथे आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
अहमदपूर येथे आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
लातूर, दि.20 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र आणि अहमदपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 21 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी दहा वाजता अहमदपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयो
या मेळाव्यात लातूर, पुणे जिल्ह्यातील सहा आस्थपाना, उद्योजक यांनी एकूण 385 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती येथील पियाजिओ व्हेइकल्स प्रा. लि., पुणे येथील एचआर मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रा. लि., पुणे येथील महले आनंद थर्मल आणि दना आनंद इंडिया प्रा. लि. , गॅब्रियेल इंडिया प्रा. लि., लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (अहमदपूर शाखा), लातूर येथील एमएस प्रॉपर्टी डेव्हलपर्स प्रा. लि. या नामांकित आस्थापनांचा समावेश आहे. या आस्थापनांना इयत्ता सातवी, दहावी, बारावी, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, एमबीए, आयटीआय (सर्व ट्रेड), सिव्हील डिप्लोमा, मॅकेनिकल डिप्लोमा, बी. ई. तसेच इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
या रिक्त पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाला अहमदपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे स्वखर्चाने स्वतःचा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. अहमदपूर तालुक्यातील तसेच लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 02382- 299462 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment