जवाहर नवोदय विद्यालयप्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेश अर्जात दुरुस्तीची संधी

 

जवाहर नवोदय विद्यालयप्रवेश परीक्षेच्या

ऑनलाईन प्रवेश अर्जात दुरुस्तीची संधी

लातूर, दि. 15 (जिमाका): जवाहर नवोदय विद्यालय शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी इयत्ता सहावीकरिता प्रवेश परीक्षा शनिवार, दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी, 2023 होती. ज्या पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना काही चुकीची माहिती भरली असल्यास त्यांना अर्जात सुधारणा करण्याची सुविधा www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 16 ते 17 फेब्रुवारी, 2023 रोजी उपलब्ध असेल.

ऑनलाईन नोंदणीकृत उमेदवारांच्या प्रवेश अर्जात संवर्ग (सामान्य/अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागास), लिंग (स्त्री/पुरुष), क्षेत्र (ग्रामीण/शहरी), दिव्यांगत्व आणि परीक्षेचे माध्यम यामध्ये दुरूस्ती करता येईल. जवाहर नवोदय विद्यालयात मुलगा, मुलगी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग, शहरी-ग्रामीण यामध्ये स्वतंत्र आरक्षण असल्यामुळे, पालकांनी भरलेली  माहिती अचूक असल्याची  खात्री करावी.

लातूर हे शहर महानगरपालिका, उदगीर, निलंगा, अहमदपूर, औसा ही शहरे नगरपालिका आणि चाकूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट, रेणापूर शहरी नगरपंचायत क्षेत्राखाली येतात. विद्यार्थ्यांने इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी दरम्यान एक दिवस जरी शहरी भागात शिक्षण घेतले असेल, तर तो नियमांनुसार शहरी क्षेत्रांतर्गत गणला जाईल. दिनांक 17 फेब्रुवारी 2023 नंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षेचे माध्यम, क्षेत्र, लिंग, संवर्ग, यामध्ये बदल करता येणार नाही. याची सर्व जबाबदारी पालक आणि संबंधित शिक्षकांची राहील. याबाबत अधिक माहितीसाठी प्रवेश परीक्षा प्रभारी बी. डी. शेख (भ्रमणध्वनी क्र. 9817834930), व्ही. एच. खिल्लारे (भ्रमणध्वनी क्र. 9860568840) किंवा जवाहर नवोदय विद्यालयाच्या 02382-267613 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु