अटल भूजल योजनेतंर्गत निलंगा येथे तालुकास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण उत्साहात

 

अटल भूजल योजनेतंर्गत निलंगा येथे

तालुकास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण उत्साहात

 


लातूर, दि.10 (जिमाका) :  केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अटल भूजल योजना जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी याविषयावर एक दिवसीय तालुकास्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम निलंगा येथील श्री अटल बिहारी सभागृहात नुकताच झाला. भूजल सर्वेक्षण आणि विकाय यंत्रणा कार्यालयामार्फत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. निलंगा उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांच्या हस्ते अटल कलश पूजनाने प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले.

भूजल सर्वेक्षण आणि विकाय यंत्रणेचे वरिष्ठ भूजल वैज्ञानिक तथा अटल भूजल योजना जिल्हास्तरीय समन्वय समितीचे सदस्य सचिव एस. बी. गायकवाड, निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यावेळी उपस्थित होते.


अटल भूजल योजना गावात यशस्वीपणे राबविणेसाठी गावातील जलसुरक्षा तसेच भूजल मित्र यांनी सहकार्य करावे. तसेच केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनाचे अभिसरण करून गावस्तरावर भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीमती जाधव यांनी केले.

उपविभागीय मृद व जलसंधारण कार्यालायचे प्रदीप काळे यांनी मृद व जलसंधारण कामा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पंचायत समिती पशुसंवर्धन कार्यालयाचे बी. टी. सूर्यवंशी यांनी शेतकऱ्यांसाठी पशुधनाबाबत राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती दिली.

गट विकास अधिकारी श्री. ताकभाते यांनी ग्रामीण भागात पाण्याचे नियोजन, पाण्याचा वापर व पुनर्भरण आणि जलजीवन मिशन अंर्तगत हर घर जल  योजनेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच अटल भूजल योजनेसाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. लोकसहभागानुसार गावाचा पाण्याचा ताळेबंद मांडून सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर केल्यास पिकांना कमी पाणी लागून उत्पनात वाढ होते. शिवाय कमी पाणी लागणाऱ्या पिकाची लागवड करून गावाचा सर्वांगिण विकास साध्य करावा, असे आवाहन श्री. ताकभाते यांनी केले.

वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. गायकवाड यांनी जलसुरक्षा आराखड्यामध्ये समाविष्ट विविध संलग्न विभागातील प्रस्तावित कामांची माहिती देवून अटल भूजल योजनेतंर्गत गावस्तरावरील पर्जन्यमापक यंत्र, बॉटल लेव्हल इंडिकेटर, रिर्चाज शाफ्ट आदी विषयांची माहिती दिली.

मौजे जाजनूर येथील प्रगतशील शेतकरी बालाजी गोमसाळे यांनी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेती केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होवून शेतकऱ्यांनी शेतीसोबत शेतीशी निगडीत जोडव्यवसाय करावा असे आवाहन केले.

जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील अक्षय पटारे, चंद्रशेखर सूरवसे भूजल तज्ञ, बालाजी गोरपल्ले कृषी तज्ज्ञ, शुभम शिंदे जलसंधारण तज्ज्ञ, रियाज पठाण हे यावेळी उपस्थित होते. तसेच जिल्हा अंमलबजावणी  भागीदारी संस्थांचे कुलदिप कांबळे, प्रकल्प समन्वयक विषय तज्ज्ञ व गौतम सोनकांबळे समूह संघटक व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील शिक्षण संवाद तज्ज्ञ एच. आर. नाईक यांनी सूत्रसंचालन केले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु