लातूर जिल्ह्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध; टंचाई नाही
लातूर जिल्ह्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध; टंचाई नाही लातूर, दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात सध्या 34 हजार 305 मे. टन रासायनिक खते उपलब्ध असून, यापैकी 546 कृषी सेवा केंद्रांमध्ये 7 हजार 17 मे. टन युरिया खत उपलब्ध आहे. यामुळे जिल्ह्यात खतांची टंचाई नाही. शेतकऱ्यांना खतसाठ्याची माहिती https://adozplatur.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding.html?m=1 या ब्लॉगवर दररोज अद्ययावत केली जाते. सोयाबीन पिकाचे जिल्ह्यात 4 लाख 85 हजार 182 हेक्टर क्षेत्र असून, हे पीक फुले लागणे ते शेंगा भरणे अवस्थेत आहे, त्यामुळे युरियाची गरज नाही. युरियाच्या वाढीव दराने विक्री किंवा टंचाईबाबत कोणतीही लिखित तक्रार नाही. जिल्ह्यात 713 कृषी सेवा केंद्रांची निरीक्षकांमार्फत तपासणी झाली असून, अनियमितता आढळलेल्या 15 दुकानांचे परवाने काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहेत. तसेच एका दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. वाढीव दराने विक्री किंवा सक्तीच्या लिंकिंगच्या तक्रारी असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विभाग किंव...