जिल्हयात नाफेडच्या वतीने तुर खरेदी केंद्र सुरु
लातूर,दि.24:- हंगाम 2019-20 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या वतीने तुर शेतमालाची खरेदी सुरु करण्यात आलेली आहे, लातूर जिल्हयातील लातूर,उदगीर, औसा,अहमदपूर,हालसी (निलंगा), चाकुर,रेणापूर, हालकी (शिरुर अनंतपाळ),लोणी व देवणी या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहेत.त्याकरीता संबंधीत संस्थांना खरेदीचे आदेश देण्यात येत आहेत.
तरी जिल्हयातील तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर तूर आणावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                        ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत