अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणीसाठी येत्या सोमवारी हत्तेनगर येथे नोंदणी मार्गदर्शन विशेष कॅम्प

 

अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणीसाठी

येत्या सोमवारी हत्तेनगर येथे नोंदणी मार्गदर्शन विशेष कॅम्प

 

लातूर दि.25(जिमाका):-अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियमन 2011 हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दिनांक 5 ऑगस्ट, 2011 पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेस सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करुन देणे हा आहे. त्याअंतर्गत अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणी घेणे आवश्कय आहे.

सोमवार, दिनांक 28 फेब्रुवारी, 2022 रोजी 11-00 ते 2-00 या वेळेत कृष्णा एजन्सीज, हत्ते नगर, लातूर येथे परवाना व नोंदणीबाबत विशेष कँम्प आयोजित करण्यात आलेला आहे असे सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन म.राज्य, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

 

0000

 

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत