सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन लातूर, दि. २ (जिमाका): महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१(१) (ब) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ६९ (१) (फ) मधील तरतुदीनुसार, सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षणासाठी सन २०२६-२०२८ या कालावधीची राज्यस्तरीय लेखापरिक्षकांची नवीन नामतालिका तयार करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांकडून ६ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र लेखापरिक्षकांनी https://mahasahakar.maharashtra.gov.in/en/ या संकेतस्थळावर जाऊन विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत. ऑनलाईन अर्जासंदर्भातील सविस्तर परिपत्रकीय सूचना सहकार विभाग, सहकार आयुक्त व निबंधक यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, या सूचनांची प्रत सर्व जिल्हा उपनिबंधक, जिल्हा विशेष लेखापरिक्षक आणि विभागीय सहनिबंधक यांच्या कार्यालयामध्येही इच्छुकांच्या माहितीसाठी उपलब्ध आहे. तरी संबंधित व्यावसायिक आणि संस्थांनी या संधीचा लाभ घेऊन वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन लातूरचे जिल्हा उपनिबंधक व्ही. एल. पोतंगले यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत