दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी वाढीव क्रीडा गुणांसाठी प्रस्ताव 15 मार्च पर्यंत सादर करावेत -जिल्हा क्रीडा अधिकारी

 

दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांनी

वाढीव क्रीडा गुणांसाठी प्रस्ताव 15 मार्च पर्यंत सादर करावेत

                                                     -जिल्हा क्रीडा अधिकारी

लातूर दि.24 ( जिमाका ):- माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत क्रीडा आयुक्तांनी सर्व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सुचित केलेले आहे.

कोविड-19 च्या प्रादुर्भावामूळे सन 2021-22 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीसाठी  बाबतीत इयत्ता सातवी व इयत्ता आठवी मध्ये शिकत असताना या खेळाडूने विविध स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येईल.

तसेच इयत्ता बारावी साठी प्रविष्ठ होणाऱ्या (खेळाडू) विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर विद्यार्थी इयत्ता नववी व इयत्ता दहावी मध्ये शिकत असताना या खेळांडूनी  विविध स्तरावरील स्पर्धतील सहभाग विचारात घेवून सन 2020-21 मध्ये क्रीडा गुणांची सवलत देण्यात येणार आहे.

लातूर जिल्ह्यातील पात्र खेळाडू विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी व शिक्षण मंडळाचा क्रीडा सवलत गुणासाठी असलेला जुनाच फॉरमॅट वापरुन परिपूर्ण प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. सदर प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2022 आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, औसा रोड,लातूर येथे संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मदनलाल गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत