“नको दुरावा द्या आधार जागतिक मानसिक आरोग्य दिन निमित्त शासकीय नर्सिंग स्कूल बाभळगाव येथे कार्यशाळा संपन्न

 नको दुरावा द्या आधार

जागतिक मानसिक आरोग्य दिन निमित्त शासकीय नर्सिंग स्कूल बाभळगाव येथे कार्यशाळा संपन्न

         लातूर,दि.20 (जिमाका)- 10 ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे बीद्र वाक्य हे मानसिक आरोग्य आणि कल्याण प्राथमिकता तुमची आमची नव्हे तर सर्वाची" "Making Mental Health and wellbeing for all a global Priority" आहे.

            या दिनाचे औचित्य साधून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम लातूर यांनी शासकीय नर्सिंग स्कूल बाभळगांव येथे 14 ऑक्टोंबर, 2022 रोजी मानसिक आरोग्य व ताण तणाव व्यवस्थापन या विषयी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, (निवासी वैद्यकीय अधिकारी),डॉ. पाठक  (निवासी वैद्यकीय अधिकारी) डॉ. मोनिका पाटील डॉ. आनंद कलमे यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला, यावेळी शासकीय नर्सिंग स्कूल बाभळगांव अमोल आडे प्राचार्य,  सुनिता मिसाळ टवीटर व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम लातूर येथील श्रीमती सरिता शेंडे मानसशास्त्रज्ञ तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम येथील डॉ. माधुरी उटीकर जिल्हा सल्लागार व संध्या शेडोळे सामाजिक कार्यकर्ती उपस्थिीत होते.

             श्रीमती सरिता शेंडे मानसशास्त्रज्ञ, यांनी विद्यार्थ्यामध्ये होणारे मानसिक आजाराबाबत व निंद्रानाश व बदलत्या जीवनशैलीबाबत ताणतणाव इत्यादी बाबत माहिती दिली, येणाऱ्या आयुष्यात तणावाला कसे सामोरे जायचे व हसत हसत ताण कसा कमी करावा व आहार विहार निद्रा मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. यांनी योगा प्राणायाम वं मानसिक उपचार व मानसिक रोगतुन मुक्त जीवन जगावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच डॉ. माधुरी उटीकर यांनी विद्यार्थ्याना तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम व आजार व उपचार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

             हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शासकीय नर्सिंग स्कूल बाभळगाव येथील प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम लातूर अधिकारी व कर्मचारी टीम यांनी परिश्रम घेतले.

                                                                             *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत