०५ - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक लातूर जिल्ह्यातील मुद्रक यांची आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

 

०५ - औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

लातूर जिल्ह्यातील मुद्रक यांची आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

 

         लातूर, दि. ०१ (जिमाका) : ०५-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत प्रचार साहित्य छपाई करणारे मुद्रक (प्रिंटर्स)यांच्याकडून लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे व भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २) सकाळी साडेदहा वाजता जिल्ह्यातील मुद्रक (प्रिंटर्स) यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

              भारत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबर २०२२ रोजी ०५-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक लढविणाऱे उमेदवार यांच्यामार्फत पॉम्प्लेट, पोस्टर, बॅनर इत्यादींची छपाई करून निवडणूक प्रचारासाठी वापर करण्यात येतो. भारत निवडणूक आयोगाने पॉम्प्लेट, पोस्टर, बॅनर इत्यादींची निवडणूक साहित्याबाबत वेळोवेळी घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

          या अनुषंगाने जिल्ह्यातील पॉम्प्लेट, पोस्टर, बॅनर आणि इतर प्रचार साहित्य छपाई करणारे मुद्रक तथा प्रिंटर्स यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला जिल्ह्यातील मुद्रक तथा प्रिंटर्स यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

                                                      ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत