संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे विभागीय कार्यलय लातूर येथे सुरु होणार

 

लातूर दि. 18 (जिमाका) : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय लातूर येथे लवकरच सुरु होणार असल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.टी. जिभकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय लातूर येथे सुरु करण्यात यावे. जेणेकरून लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील समाजबांधवांची औरंगाबाद येथे विभागीय कार्यालयामध्ये जाताना होणारी गैरसोय थांबेल, अशी मागणी काही सामाजिक संघटनांनी केली होती. या मागणीची दखल घेत महामंडळ मुख्यालयाने कार्यवाही सुरु केली आहे.

 मुख्यालयाने याबाबत पाठविलेल्या प्रस्तावाला संचालक मंडळाने 21 जून 2023 रोजी मंजुरी दिली आहे. तसेच प्रशासकीय कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. लवकरच लातूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाचे विभागीय कार्यालय सुरु होणार असल्याने समाज बांधवांना लाभ होईल, असे श्री. जिभकाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

माविमच्या नवतेजस्विनी महोत्सवाचा समारोप महिलांनो स्वप्न मोठी पहा आणि ते जिद्दीने पूर्ण करा जिल्हाधिकारी पी. बी. पृथ्वीराज यांचे महिला बचत गटांना आवाहन

सर्वांगीण उन्नतीवर भर-अ‍ॅड. यशोमती ठाकूर मंत्री, महिला व बालविकास