टपाल विभागामध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध

लातूर, दि. 5 (जिमाका) : स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाच्यावतीने ‘हर घर तिरंगा 2.0’ अभियान राबविले जाणार आहे. भारतीय डाक विभागाने या अभियानास प्रारंभ केला असून या अंतर्गत लातूर जिल्हांतर्गत विविध डाक कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

टपाल कार्यालयांमध्ये 25 रुपयांना एक तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध असून मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वजाची मागणी असल्यास मुख्य डाकघर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डाक अधीक्षक एस. एन. अंबेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी लातूरचे मुख्य पोस्ट मास्टर बी. व्ही. हळणे (भ्रमणध्वनी क्र. 9284219318) किंवा जनसंपर्क अधिकारी बी. सी. माळी (भ्रमणध्वनी क्र. 9422468417) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

लातूर जिल्ह्यातील सरपंच पद आरक्षणासाठी २४ व २५ एप्रिल रोजी सोडत

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

एम-सॅन्‍ड उत्‍पादक म्‍हणून परवानगी मिळविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित