महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा लातूर दौरा

 


लातूर, दि. 26 (जिमाका): महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या 27 व 28 ऑगस्ट 2023 रोजी दोन दिवसांच्या लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

श्रीमती चाकणकर यांचे 27 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता बीड येथून लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व मुक्काम. 28 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या उपस्थितीत लातूर शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी महिला शहर, जिल्हा कार्यकारणीची बैठक होईल.

28 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमती चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जनसुनावणी होईल. दुपारी दोन ते तीन राखीव. दुपारी तीन वाजता त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय आढावा बैठक होईल. सायंकाळी पाच वाजता त्या पत्रकार परिषद घेतील. सायंकाळी सहा वाजता धायरी, पुणेकडे प्रयाण करतील.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत