महसूल सप्ताह अंतर्गत 5 ऑगस्ट रोजी सर्व तहसील कार्यालयात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रम

 

महसूल सप्ताह अंतर्गत 5 ऑगस्ट रोजी

सर्व तहसील कार्यालयात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रम

लातूर, दि. 1 (जिमाका): जिल्ह्यातील सर्व आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, शहीद जवानाच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व त्यांचे अवलंबित यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महसूल विभागामार्फत 05 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित तहसील कार्यालयात सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी सैनिकाच्या अडीअडचणी  दूर करणे, त्यानां लागणारी प्रमाणपत्रे, दाखले व इतर लाभ महसूल विभागामार्फत देण्याची कार्यवाही यावेळी केली जाणार आहे. तरी या उपक्रमास आजी, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, शहीद जवानाच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व त्यांचे अवलंबित अर्जदारांनी स्वत: उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (नि.) शरद पांढरे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत