जलसंधारणाच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही-मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड • औसा तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी

जलसंधारणाच्याकामांना निधी कमी पडू देणार नाही-मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड•औसा तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी लातूर, दि. 6 (जिमाका) : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीतजिरण्यासाठी राज्य शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारअभियान राबविले जात आहे. या अंतर्गत औसा तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील जलसंधारणाच्याकामांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडयांनी सांगितले. त्यांनी आज औसा तालुक्यातील फत्तेपूर, दावतपूर, तांबरवाडी, राजेवाडीयेथील जलसंधारणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली.औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार दिनकरमाने, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, औसा पंचायत समिती सभापतीगंगाबाई कोदळीकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चंद्रशेखर सोनवणे, जिल्हा जलसंधारणअधिकारी जावेद पटेल, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेबशेलार, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षित पवार, टाटा मोटर्स फाऊंडशनचे जिल्हासमन्वयक प्रमाद घायाळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.औसा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रत्येक गावातजलसंधारणाची कामे करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी पुढाकार घेतला आहे. पहिल्याटप्प्यात सात गावांची निवड करून या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या संकल्पनेतूनजलसमृद्ध औसा अभियान राबविण्यात येत आहे. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून या उपक्रमामुळेनिर्माण होणारा जलसाठा आणि भूजल पुनर्भरणामुळे भूजल पातळीत वाढ होईल. त्याचा आगामीकाळात शेतकऱ्यांना फायद होईल. या गावांमध्ये नवीन बंधारा, बंधारा दुरुस्ती, नाला खोलीकरणयासारख्या कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. गावाचा विकास करण्यात गावकऱ्यांचीभूमिका महत्वाची असते. गाव समृद्ध होण्यासाठी गावात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामेहोणे आवश्यक असून यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्रीश्री. राठोड यांनी केले.औसा तालुक्यातील भौगोलिक स्थितीमुळे याठिकाणी सिंचनासाठी पाण्याचीअपुरी सुविधा आहे. त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर मात करण्यासाठी तालुक्यातजलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करून भूजल पुनर्भरण करण्यावर भर देण्यात येत आहे. जलसमृद्धऔसा अभियान अंतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांची एकत्रितअंमलबजावणी करण्यात येत आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून पहिल्या टप्प्यात तालक्यातील तांबरवाडी,दावतपुर, महादेववाडी, फत्तेपुर, पारदेवाडी, कवळी (हि.) आणि  हिप्परगा(क.) या सात गावांची निवड करण्यात आली आहे.राज्य शासन, टाटा मोटर्स फाउंडेशन, नाम फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन मार्फत यागावांमध्ये जलसंधारणाची कामे सुरु असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी सांगितले.तसेच पुढील टप्प्यात औसा तालुक्यातील सर्वच गावांचा समावेश या गावांमध्ये केला जाणारअसल्याचे त्यांनी सांगितले.                              मृद व जलसंधारण मंत्र्यांकडूनजलसंधारणाच्या कामांची पाहणीमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी औसा तालुक्यातील फत्तेपूरयेथील सुमारे ७ किलोमीटर नाल्याचे आणि तांबरवाडी, राजेवाडी येथील सुमारे ६ किलोमीटरनाल्याच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाची प्रत्यक्ष पाणी केली. तसेच दावतपूर येथे अभिसरणातूनउभारण्यात आलेली अंगणवाडी इमारत, कांदाचाळ, जनावरांचा गोठा यासह विविध विकास कामांचीपाहणी केली. तसेच याठिकाणी नाला खोलीकरण कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.येथील अमृत तलाव संवर्धन कामाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी, ग्रामस्थांशीहीसंवाद साधला.                                                                                  ***

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन