इस्रायलमध्ये होम-बेस्ड केअरगिव्हर नोकऱ्यांसाठी लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींना सुवर्णसंधी

इस्रायलमध्ये होम-बेस्ड केअरगिव्हर नोकऱ्यांसाठी लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींना सुवर्णसंधी लातूर, दि. 06 (जिमाका) : केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या पुढाकारातून आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एनएसडीसी यांच्या सहकार्याने इस्रायलमध्ये होम-बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील उमेदवारांना ही मोठी रोजगाराची संधी असून एकूण 3500 पदे उपलब्ध आहेत. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा अंदाजे २ लाखापर्यंत वेतन मिळू शकते. इस्रायलमध्ये प्रशिक्षित केअरगिव्हरची मोठी मागणी असल्यामुळे भारतीय उमेदवारांना प्राधान्य दिले जात आहे. पात्रता निकषांनुसार उमेदवारांचे वय 25 ते 45 वर्षे दरम्यान असावे. किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे किमान 3 वर्षे वैध पासपोर्ट असावा, तसेच इंग्रजी भाषेचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असून उंची किमान 4.5 फूट आणि वजन किमान 45 किलो असावे. उमेदवारांनी केअरगिव्हिंग क्षेत्रातील किमान 990 तासांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे आणि ते प्रशिक्षण भारतीय मान्यताप्राप्त संस्थेकडून घेतलेले असणे आवश्यक आहे. GDA (General Duty Assistant), Home Health Aide किंवा तत्सम कोर्स केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. महिलांसाठी 80 टक्के आणि पुरुषांसाठी 20 टक्के पदे राखीव आहेत. निवड प्रक्रिया इस्रायली नियोक्त्यांकडून केली जाणार असून भारत सरकार किंवा एनएसडीसी हे नियोक्ता म्हणून कार्य करणार नाहीत. एनएसडीसी केवळ सुविधा पुरवणारी संस्था म्हणून काम करेल. निवड झाल्यानंतर कामासाठी इस्रायलमध्ये जाताना कुटुंबियांना (पती, पत्नी किंवा मुले) सोबत नेण्याची परवानगी असणार नाही. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि अर्ज प्रक्रियेसाठी https://maharashtrainternational.com/jobdetail.aspx किंवा या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा दत्तात्रय कांबळे मो. क्र. 9028238465 संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी केले आहे. ****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन