लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत आवाहन

लातूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत आवाहन लातूर, दि. ४ (जिमाका): येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सन २०१६ ते २०२० या वित्तीय वर्षात प्रवेशित अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम समाज कल्याण विभागाकडून मंजूर झाली आहे. परंतु, संबंधित प्रशिक्षणार्थ्यांचे बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड आणि मोबाईल क्रमांक उपलब्ध नसल्याने शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकलेली नाही. तरी सन २०१६ ते २०२० या कालावधीतील पात्र विद्यार्थ्यांनी आपले सध्या सुरू असलेले बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ओळखीचा इतर पुरावा घेऊन २० मे २०२६ पर्यंत संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे व आपली शिष्यवृत्तीची रक्कम रोखा विभागाकडून प्राप्त करून घ्यावी. जे विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांनी आपले सर्व आवश्यक कागदपत्रे संस्थेच्या latur_iti@yahoo.com या ईमेलवर पाठवावीत. विहित मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास शिष्यवृत्तीची रक्कम वाटप न करता ती शासनास जमा केली जाईल, असे लातूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय माळकुंजे यांनी कळविले आहे. *****

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय योजनांच्या लाभासाठी एन.एफ.डी.पी. पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सहकारी गृहनिर्माण संस्था निवडणूक निर्णय अधिकारी पॅनेलसाठी अर्ज करावेत

सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षकांसाठी नामतालिका तयार करण्याची प्रक्रिया सुरू; ६ एप्रिलपासून ऑनलाईन अर्जांचे आवाहन