जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडनुक अधिसुचना
10 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार
         लातूर,दि. 09: राज्यातील 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका-2017 निवडणूक विभाग, निर्वाचक गणांची रचना व आरक्षणाची सोडत काढण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिनांक 18 ऑगस्ट 2016 रोजी कार्यक्रम देण्यात आला आहे. त्या कार्यक्रमानुसार :- (1) सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर 2016 रोजी प्रारुप प्रभाग रचनेची अधिसुचना निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचना आरक्षणासह जिल्हाधिकारी लातूर यांच्या कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. (2) जिल्हा परिषद, लातूर यांच्या कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे (3) तहसिलदार अहमदपूर, जळकोट, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, लातूर, औसा, निलंगा यांच्या कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे (4) पंचायत समिती अहमदपूर, जळकोट, उदगीर, देवणी, शिरुर अनंतपाळ, चाकूर, रेणापूर, लातूर, औसा, निलंगा याच्या कार्यालयातील फलकावर प्रसिध्द करण्यात येणार आहे (5) जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेत स्थळ www.latur.nic.in येथे प्रसिध्द करण्यात येणार आहे.
           सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर 2016 ते गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर 2016 पर्यंत प्रसिध्द पारुप प्रभाग रचनेची अधिसुचनेवर हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी आहे. तर जिल्हाधिकारी लातूर यांच्या वतीने तहसिलदार (सा.) जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांना कार्यालयीन वेळेत सुचना व हरकती स्विकारण्यासाठी प्राधिकत करण्यात आले आहे.  


*****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु