जिल्ह्यातील शेतक-यांनी शेती औजारांसाठी
कृषि यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा
लातूर, दि.3: शेतीमध्ये मजुरीवर होणा-या खर्चात
बचत करणे व मशागतीची कामे वेळेवर, जलदगतीने करण्यासाठी कृषि विभागाच्या माध्यमातून
कृषि यांत्रिकीकरण उपअभियान ही योजना सन 2016-17 मध्ये लातूर जिल्ह्यात राबविण्यात
येत आहे. सदर योजनेत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कुटुंबातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त
कुटूंबातील शेतकरी व शेतकरी गटातील सभासदास प्राधान्य देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ
घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी तात्काळ संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी
संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रतापसिंह कदम यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
या अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती, अल्प, अत्यल्प
भु-धारक, महिला शेतक-यांना कमाल एक लाख पंचवीस हजार रुपये व इतर लाभार्थ्याना एक लाख
रुपये अनुदान आहे. तसेच पॉवर टिलरसाठी अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती, अल्प, अत्यल्प
भु-धारक, महिला शेतक-यांना कमाल रु. 75 हजार व इतर लाभार्थ्यांना कमाल रु. 60 हजार
अनुदान आहे. तथापि प्रत्यक्षात सदर औजारासाठी
लागणारी अश्वशक्ती विचारात घेऊन त्यामर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहिल, असे श्री . कदम
यांनी सांगितले आहे.
अनुसूचित
जाती, अनुसूचीत जमाती, अल्प, अत्यल्प भु-धारक, महिला शेतक-याना किमतीच्या 50 टक्के
व सर्वसाधारण प्रवर्गास किमतीच्या 40 टक्के अनुदान मर्यादेत चाफकटर(5 एच.पी) (अनुदानाची
उच्चतम मर्यादा रु. 18 हजार), ट्रॅक्टरचलीत औजारे/उपकरणे (अनुदानाची उच्चतम मर्यादा
63 हजार रुपये), मनुष्यचलीत/प्राणीचलीत औजारे/उपकरणे (अनुदानाची उच्चतम मर्यादा रु.
10 हजार रुपये), मनुष्यचलीत पिक संरक्षण उपकरणे (अनुदानाची उच्चतम मर्यादा रु. 600
रुपये) व प्रक्रिया सयंत्रे/उपकरणे(अनुदानाची उच्चतम मर्यादा रु. 1.50 लाख रुपये) अनुदानवर
देण्यात येणार आहेत. तसेच भाडेतत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि यांत्रिकीकरण
औजारे बॅंक स्थापन करण्यासाठी 20 लाख अनुदानाची 5 औजार बॅंकेचे लक्षांक लातुर जिल्ह्यासाठी
प्राप्त आहे.
या उप अभियानातुन वरीलप्रमाणे अनुदानवर शेतक-यांना औजारे खरेदी करताना राज्य
शासनाने दर निश्चीत केलेल्या यादीतील कृषि औजारांची शेतक-यांना निवड मुभा राहिल. लाभार्थ्यांनी
कृषि औजारांची लेखी मागणी दि.20 ऑक्टोबर 2016 पर्यत अर्जाद्वारे संबधित
तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे करायची आहे. लाभार्थी निवड योजनेच्या जिल्हास्तरीय
कार्यकारी समिती मार्फत होणार आहे. लाभार्थी निवडताना प्रथम प्राप्त प्रथम प्राधान्य
तत्व अवंलबिले जाणार आहे.
जिल्ह्यातील प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत पुर्वसंमती
देण्यात येईल. पुर्वसंमती मिळाल्यानंतर औजारासाठी लागणारी एकूण रक्कम सुरुवातीस महाराष्ट्र
कृषि उद्योग विकास महामंडळ याचेकडे भरणे बंधनकरक आहे. औजाराचे अनुदान नंतर लाभार्थीच्या
बॅंक खात्यावर आरटीजीएस द्वारे जमा करण्यात येईल. औजारांचा पुरवठा कृषि उद्योग विकास
महामंडळामार्फत केला जाणार असल्याने अर्जसोबत कृषि उद्योग महामंडळाचे औजारे/उपकरणे
दरपत्रक जोडणे आवश्यक आहे, असे प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.
*****
Comments
Post a Comment