प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी
संबंधित बँकेकडे अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. 7 : लातूर जिल्हयात दिनांक  15 जून 2016 ते 30 जूलै 2016 या कालावधीमध्ये खरीप हंगामात एकूण 6 लाख 17 हजार 812 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सोयाबीन काढणीच्या वेळेस सप्टेंबर अखेर अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
शासनाने या वर्षी पुर्वीची राष्ट्रीय पिकविमा  योजना बंद करून राज्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केलेली आहे. या  योजनेतील  मार्गदर्शक सुचनानुसार अतिवृष्टी, पावसातील खंड, नापिकी व किड लागून पिकांची झालेली नुकसान भरपाईसाठी पिक कापणी प्रयोगावरुन उपलब्ध झालेल्या उत्पादनाच्या सरासरी आकडेवारीच्या आधारावर निश्चित  करण्यात  येणार  आहे. जिल्हयात  पिक  कापणी  प्रयोगाची  मंडळ निहाय पथके तयार करुन संबंधित इफको टोकियो  जनरल  इन्सुरन्स  कंपनी  व  कृषी  विभागास सुचना देण्यात आल्या आहेत. पिक कापणी प्रयोगाचे वेळापत्रक   www.latur.nic.in    या संकेत  स्थळावर  प्रसिध्द  करण्यात  आले  आहे.
प्रधानमंत्री  पिक  विमा  योजनेअंतर्गत कापणी पिकाचे वैयक्तीक स्तरावरील पंचनामे हे फक्त पुराचे पाणी शेतात साठून, गारपीठ व भूस्खलन या कारणाने होणारे पिकांचे नुकसान तसेच पिक काढणी पश्चात चक्रीवादळ  व अवकाळी पावसापासून  नुकसान यासाठी वैयक्तिक पाहणी इफको टोकियो जनरल इन्शूरन्स  कंपनीव्दारे करण्यात येणार आहे. या बाबीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती इफको टोकिया जनरल इन्शूरन्स कंपनी लि. यांना अर्जासोबत  खरीप  हंगामात प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये पिक विमा भरलेली पावती व सातबारा जोडून संबंधित बँकेकडे अर्ज करावा. अर्जासोबत सातबारा जोडला नसेल  तरी  चालेल, असे जिल्हाधिकारी लातूर यानी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु