विक्रीकर विभागाने शेवटच्या घटकांपर्यंत करांची माहिती पोहचवावी
                                                      -ना. संभाजी पाटील -निलंगेकर
         लातूर,दि. 01: राज्याच्या एकूण कर महसूलात विक्रीकर विभागाचा वाटा जवळपास 60 टक्के आहे. तसेच विक्रीकर जमा करण्यासाठी विभागाने अद्यावत यंत्रणांचा वापर सुरु केलेला आहे. परंतु समाजातील अनेकांना करांविषयी माहिती नसते. तरि विक्रीकर विभागाने शेवटच्या घटकांपर्यंत करांची माहिती पोहचविण्याचे आवाहन कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
               जिल्हाधिकारी कार्यलयाच्या सभागृहात आयोजित विक्रीकर दिन सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, महापौर दिपक सुळ, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, विक्रीकर उपायुक्त जी. एस. गवंडी, उपजिल्हाधिकारी प्रदीप मरवाळे याच्यासह विक्रीकर विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कर भरणा करणारे व्यापारी उपस्थित होते.
          श्री. निलंगेकर म्हणाले की, राज्य शासन शासकीय योजनांची अंमलबजावणी वेगळ्या पध्दतीने करत असल्याने योजना अधिक यशस्वी होत आहेत. विक्रीकर विभागाने महसूल  वसुलीचे देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण केले असून  त्याकरिता विक्रीकर विभाग अभिनंदनास पात्र आहे. तसेच पुढील काळात विक्रीकर विभागाने अधिकारी, कर्मचारी व व्यापारी वर्गाचे एकत्रीत मेळावे आयोजित करून  कर प्रणालीची माहिती व्यापाऱ्यांना द्यावी असे त्यांनी सांगितले. तसेच विक्रीकर विभागाने कर वसूली करण्यासाठी सामाजिक माध्यामांचा ही प्रभावी वापर करून  सर्वसामान्य व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन श्री. निलंगेकर यांनी केले.
        यावेळी खासदार सुनिल गायकवाड,आमदार सुधाकर भालेराव, महापौर दिपक सुळ यांनीही  यथोचित मार्गदर्शन केले. प्रारंभी  ना. निलंगेकर  व मान्यवराच्या हस्ते दीजप्रज्वलन व प्रतिमा पुजन करुन विक्रीकर दिन सोहळयाचे उदघाटन करण्यात आले.
        कार्यक्रमाचे प्रास्तावीक विक्रीकर उपायुक्त श्री. गवंडी यांनी करुन विक्रीकर दिनाच्या आयोजनाची व कर वसुलीची सविस्तर माहिती दिली तर विक्रीकर अधिकारी  स्वाती जगताप यांनी आभार मानले.
राष्ट्रीय अर्थसहाय्य कुटुंब योजनेचे धनादेश वाटप :-


       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लातूर तहसिल कार्यालयामार्फत राष्ट्रीय अर्थ सहाय्य कुटुंब योजनेंतर्गत तालुक्यातील पात्र 35 लाभार्थ्यांपैकी 9 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश कामगार कल्याण व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.  यात सुनीता विलास धोत्रे, कांबळे उत्तम गोविंदराव, शारदा गणेश अडतेवार, मायाबाई दत्तात्रय काटवटे, शेख शकिला रफिक, छाया बालाजी पाटील, निला हनुमंत टकळगे, ठकूबाई शाम गायकवाड व जाधव सुनीता विठ्ठल या लाभार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी तहसिलदार संजय वारकड व लातूर तहसिल कार्यलयाचे इतर अधिकारी- कर्मचारी ही उपस्थित होते.

****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा