राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये 85 लाख 53 हजार
रक्कमेची 310 प्रकरणे तडजोडीने निकाली
      

            लातूर,दि.08: जिल्हयातील विविध  न्यायालयामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये  85 लाख 53 हजार 449 रक्कमेची दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात दावा व कलम 138 एन. आय. ॲक्ट, एम. व्ही. ॲक्ट स्वरुपाची 310 प्रकरणे  तडजोडीने  निकाली  काढण्यात  आली.
            जिल्हा न्यायालयात आयोजित लोकअदालतीचे उदघाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे यांचे हस्ते करण्यात आले.  यावेळी  जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी, एस. एस. कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. के. चौदंते, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. बालाजी  पांचाळ, जिल्हा सरकारी वकील ॲड. एस. व्ही  देशपांडे  हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना न्या. व्ही. डी. डोंगरे  पुढे  म्हणाले  की, आपण जरी न्यायाधीश, वकील, अधिकारी असलो तरी आपण ग्रामीण भागातून व शेतकरी कुटुंबातून आलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात  घेवून  जास्तीत  जास्त  प्रकरणे तडजोडीने  मिटविण्यासाठी सामुहिक प्रयत्न  करण्याची  गरज  आहे.
            या लोकअदालतीमध्ये जिल्हा न्यायाधीश एम. एस. कुलकर्णी, मुख्य न्यायदंडाधिकारी एच. ए. एस. मुल्ला, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस.सी.पठारे, आर.जी. मलशेटटी, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती.एम.सी.                      उपाध्ये यांनी पॅनल प्रमुख म्हणून तर ॲड. शिवकुमार बनसोडे, ॲड. अप्पाराव पाटील, ॲड. संदीप हाजगुडे, ॲड. श्रीमती जे.आर. यावलकर, ॲड. आर. पी. कुचमे, ॲड. रेहाना तांबोळी, ॲड. ए. के. कांबळे, ॲड. यु. एन. राऊत, ॲड. बी. बी. गाडेकर, ॲड. नागेश माने यांनी पंच म्हणून काम पाहिले.
            ही राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक आर. एस. गंडले, आर. डी. कानगांवकर, जी. के. कंदमुळे, के. एस. गरुडकर, पी. एम.चव्हाण, के. डी. तेलंगे यांनी परिश्रम घेतले.
****


Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु