कामगारमंत्री निलंगेकर यांच्याकडून
मसलगा व पेठ येथील
पिकांच्या नुकसानीची पाहणी
लातूर,दि. 01: निलंगा
तालूक्यातील मसलगा व लातूर तालू्क्यातील पेठ गावांतील अतिवृष्टीने बाधीत झालेल्या
शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी कामगार व कौशल्य विकासमंत्री श्री.संभाजी पाटील- निलंगेकर
यांनी करून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश दिले.
कामगारमंत्री निलंगेकर म्हणाले की, अतिवृष्टीने
सोयाबीन, उडीद पिकांचे जवळपास शंभर टक्के नुकसान झालेले आहे.तरि कृषि व महसूल विभागाने
जिल्हयातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या पिकांच्या
नुकसानीची पाहणी वेळेत पुर्ण करावी.तसेच पंचनामे
करत असताना एकही अतिवृष्टीने बाधित झालेला
शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम,उपविभागीय कृषि अधिकारी आर.टी.मोरे निलंगा तहसिलदार
विक्रम देशमुख अदि मसलगा येथील पाहणीच्या प्रसंगी उपस्थित होते. तर पेठ येथे खासदार
सुनिल गायकवाड,आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी पांडूरंग पोले, जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी श्री कदम, लातूर तहसिलदार संजय वारकड अदिसह शेतकरी उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment