आरोग्य विभागाने स्तन कर्करोग तपासणी मोहिम प्रभावीपणे राबवावी
                                         -कामगारमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर




       लातूर,दि. 01: राज्यात सर्वत्र 1 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत विनाशुल्क स्तन कर्करोग तपासणी मोहिम राबविली जाणार आहे. तरि आरोग्य विभागाने सदरच्या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून जिल्हयाच्या तळागळातील महिलांपर्यंत लाभ पोहचवावा तसेच  कर्करोग निदान झाल्यास पुढील आरोग्य उपचार पध्दतीचा त्यांना वेळेत सेवा देण्याचे निर्देश कामगार व कौशल्य विकास मंत्री श्री. संभाजी पाटील - निलंगेकर यांनी दिले.
            शासकीय वैदयकीय  महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात आयोजित विनाशुल्क स्तन कर्करोग तपासणी मोहिमेच्या उदघाटनप्रसंगी कामगारमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुनिल गायकवाड, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला शिंदे यांच्यासह महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी, विद्यार्थी  कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
           श्री. निलंगेकर पुढे म्हणाले की, विनाशुल्क स्तन कर्करोग तपासणी मोहिम तळागळातील महिलांपर्यंत पेाहचविण्यासाठी शासन आरोग्य विभागाच्या पाठीशी आहे. तर आरोग्य विभागाने जास्तीत जास्त महिलांमध्ये या मोहिमेबद्यल जागृती करून त्यांना योग्य मार्गदर्शनासोबत चांगल्या आरोग्य सुविधा देण्याची सुचना त्यांनी केली. आरोग्य विभागाने पारंपारिक प्रसिध्दी माध्यामासोबतच अदयावत अशा सामाजिक माध्यामांचा या मोहिमेच्या जनजागृतीकरिता  वापर करण्याची सुचना श्री. निलंगेकर यांनी केली. या मोहिमेतर्गत सर्व महिला रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा रुग्णालयामार्फत मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
         सदयास्थिीतीमध्ये जी  शासकीय रुग्णालये  आहेत तीच अधिक चांगली करून रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या पाहिजेत.  त्यानंतर सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचा विचार करता येईल, असे श्री. निलंगेकर यांनी स्पष्ट केले. प्रत्येक शासकीय रुग्णालयाकडे असलेल्या सर्व प्रकारच्या मशिनरीचा वापर कार्यक्षमपणे करुन जास्तीत जास्त सर्वसामन्य रुग्णांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न संबंधित रुग्णालयांनी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. कारण सर्वसामन्य नागरिक विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांचा  आरोग्य व शिक्षणावर मोठा खर्च होत असतो. त्यामुळे अशा लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा शासकीय रुग्णालयात मिळाल्यास त्यांना एक प्रकारचा दिलासा मिळणार असल्याचे श्री. निलंगेकर यांनी स्पष्ट केले.
          जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांमध्ये या मोहिमेविषयी जागृती करून त्यांना सहभागी करून घेण्याचे आवाहन खासदार सुनिल गायकवाड यांनी केले. तर जिल्हाधिकारी पोले म्हणाले की, कर्करोगावर मात करण्यासाठी शासनाकडून ही विशेष मोहिम राबविली जात असून आरोग्य विभागाने जिल्हयातील सर्व उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत याबाबत माहिती करून महिला रुग्णांना सेवा देण्याची सुचना केली.
        डॉ.मंगला शिंदे यांनी या मोहिमेचा उदेश सांगितला तर  प्राचार्य डॉ. अशोक शिंदे यांनी विनाशुल्क स्तन कर्करोग तपासणी मोहिमेची सविस्तर माहिती दिली. प्रारंभी ना. निलंगेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन करून या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. तर डॉ. अनमोड  यांनी उपस्थितांचे आभार मानले.

****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु