नागरिकांनी साथीच्या रोगांवर मात करण्यासाठी
                         जिल्हा परिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
            लातूर,दि.6: पावसाळयात गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, विषमज्वर, हगवण व अतीसार अशा साथीच्या आजाराचा सामना नागरिकांना करावा लागतो. यासाठी मागील काळात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाच्या  माध्यमातून विशेष मोहिम राबविल्यामुळे जिल्ह्यात जलजन्य आजार उदभवले नाहीत, असे माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे.
सध्या जिल्हयात परतीच्या पावसामूळे नदी, नाले, ओढे यांना पुर आलेला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे उद्रभव स्थाने दुषीत होण्याची शक्यता गृहीत धरून सर्व पाणी स्त्रोतांचे पुनश्च क्लोरीनवॉश करण्याची मोहीम राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी,लातूर यांनी जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता समितीच्या बैठकीत आदेशीत केले आहे. संभाव्य नागरिकांना होणाऱ्या आजारावर मात करता येऊ शकेल.
यासाठी नागरिकांनी पिण्याचे पाणी निर्जतूक करून वापरावे, यासाठी पिण्याचे पाणी दुहेरी कपडयाने गाळुन घ्यावे, पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोरचा वापर करावा, नदी, नाले, ओढे,पडिक विहीरीचे पाणी दुषीत असते ते पिण्यासाठी वापरू नये, उघडयावर शौचास जाऊ नये शौचालयाचाच वापर  करावा वैयक्तीक स्वच्छता ठेवण्यात यावी.
            नागरिकांनी आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा. परिसरात घाण पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घेऊन सांडपाणी वाहते करावे. घरातील भंगार, डबे, नारळाच्या करवंटया, फुलदाण्या, कुलर, टायर्स, आदि मध्ये पाणी साठु देऊ नये. पाणी साठलेल्या डबक्यात रॉकेल किंवा ऑईल टाकावे, डासांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी अंगभर कपडे वापरावे, मच्छरदाणीचा वापर करावा, मच्छर बॅट, कॉईल इत्यादीचा वापर करावा. जेणे करून हिवताप, डेग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग इत्यादी किटकजन्य आजारापासून संरक्षण होईल.
नागरिकांनी वरील सुचनांची अंमलबजावणी करावी व संभाव्य आजारावर मात करण्यासाठी प्रशासनास मदत करावी, असे आवाहन  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणीक गुरसळ व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी संयुक्त केले आहे.
****




Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु