कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून
शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी
लातूर,दि. 10: कृषि
व पणन राज्यमंत्री श्री. सदाभाऊ खोत यांनी औसा तालुक्यातील तोंडाळी व रेणापूर तालुक्यातील
दहेली गावांमधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी केली.
यावेळी माजी आमदार पाशा पटेल, उपविभागीय
अधिकारी जनार्धन विधाते, कृषि उपसंचालक श्री. सरोदे, प्र. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
विजय पाटील, औसा तहसिलदार अहिल्या गाठाळ, गट विकास अधिकारी श्री. भालके, रेणापूरचे
तालुका कृषि अधिकारी बी. व्ही. वीर यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित
होते.
यावेळी श्री. खोत यांनी नुकसानग्रस्त
शेतक-यांच्या भेटी घेऊन एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे
निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे सांगितले. तसेच तोंडाळी येथील जिल्हा परिषदेच्या
शाळेच्या नवीन इमारतीकरिता प्रस्ताव तयार करुन त्याकरिता पाठपुरावा करण्याचे निर्देश
गट विकास अधिका-यांना दिले. तसेच तोंडाळीचा ग्रामीण रस्ता त्वरित करण्याची सूचना ही
त्यांनी केली. तोंडाळी गावाच्या पुर्नवसनाचा प्रश्न ग्रामस्थ व प्रशासनाने एकत्रित
येऊन मार्ग काढावा असे श्री. खोत यांनी सांगितले. तर स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी
लोकसंख्येचा आधार घेऊन ग्राम विकास विभागाला प्रस्ताव पाठविण्याची सूचना त्यांनी केली.
दहेली ता. रेणापूर येथील शेती पिकांच्या
नुकसानीची पाहणी केली. तसेच येथील श्री. तानाजी
माने या शेतक-याच्या शेतामधील सोयाबीन पिकांचे क्रॉप कटींग कृषि विभाग व विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या
समोर केली. विमा कंपन्यांनी पिक नुकसानीचे
अहवाल प्रशासनाला दाखवूनच पाठवावेत. त्याकरिता प्रशासनाशी समन्वय ठेवावा व शेतक-यांना
त्वरित पिक विम्याचा लाभ मिळेल याकरिता अहवाल वेळेत सादर करण्याची सूचना श्री. खोत
यांनी केली.
यावेळी तोंडाळी ता. औसा व दहेली ता. रेणापूर
येथील शेतक-यांनी व ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडून त्या त्वरित सोडविण्याची मागणी
केली.
***
Comments
Post a Comment