नैसर्गीक आपत्तीमध्ये शासन शेतक-यांसोबत आहे - पालकमंत्री लातूर,दि. 19: जिल्ह्यात दिनांक 15 मार्च 2017 रोजी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीमुळे शेतक-यांच्या शेतातील उभ्या पिकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. अशा या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन पूर्णपणे शेतक-यासोबत आहे. प्रशासनाकडून पंचनामे सुरु असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून शेतक-यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कौशल्य विकास, कामगार कल्याणमंत्री तथा पालकमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली. औसा तालुक्यातील येलुरी व वरवडा या गावांमधील शेती पिकांची पाहणी प्रसंगी श्री. निलंगेकर शेतक-यांशी संवाद साधत होते. यावेळी जालना लोकसभा मतदार संघाच...
Posts
Showing posts from March, 2017
- Get link
- X
- Other Apps
जल आराखड्याद्वारे उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे -निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे लातूर,दि. 16: पाण्याची बचत ही काळाची गरज लक्षात घेवून विविध माध्यमांच्याव्दारे सुक्ष्म स्तरावरून म्हणजे गाव पातळीवरही जललेखा व जल आराखडा तयार करून उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे व भविष्यात पाण्याच्या पातळीत वाढ करून पाणीपातळी कायम राहावी या करिता प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी केले. जलसंपदा विभाग लातूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दिनांक 16 ते 22 मार्च 2...
- Get link
- X
- Other Apps
प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे आठ दिवसात पूर्ण करुन अहवाल सादर करावा - कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत लातूर,दि. 16: जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीटीमूळे झालेल्या पिकांच्या व इतर नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे प्रशासनाने आठ दिवसात पूर्ण करावेत व त्याचा अहवाल त्वरित शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित पिक नुकसानीबाबत महसूल व कृषि अधिका-यांच्या बैठकीत कृषि राज्यमंत्री श्री. खोत बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर , विभागीय कृषि सहसंचालक शिरीषकुमार जमदाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडग...
- Get link
- X
- Other Apps
कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडून औसा तालुक्यातील पिक नुकसानीची पाहणी लातूर,दि. 16: जिल्ह्यात दिनांक 15 मार्च 2017 रोजी वादळी वा-या सह पाऊस व गारपीट झाल्याने औसा व लातूर तालुक्यातील पिकांचे नुकसान झालेले आहे. औसा तालुक्यातील नांदुर्गा, टाका, मासुर्डी व येल्लोरी या गावातील पिक नुकसानीची पाहणी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रतापसिंह कदम, जिल्हा कृषि विकास अधिकारी (जि. प.) बी. एस. रणदिवे, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे, आत्माचे प्रकल्प संचालक सी. डी. पाटील, औसा तहसिलदार अहिल्या गाठाळ, गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषि राज्यमंत्री श्री. खोत यांनी शेतक-यांच्या शेतातील गहू, मका, हरभरा, द्राक्ष, ऊस, ज्वारी आदि पिकांच्या झालेल्या...
- Get link
- X
- Other Apps
सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा द्याव्यात - पालकमंत्री लातूर,दि. 12: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहीजेत. तसेच या रुग्णालयात एकदा रुग्ण आल्यानंतर आरोग्य सुविधे अभावी तो रुग्ण दुस-या खाजगी रुग्णालयात जाऊ नये याकरिता रुग्णालय प्रशास नाने योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन कौशल्य विकास, कामगार कल्याण, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील नेत्र विभागाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री श्...
- Get link
- X
- Other Apps
सामाजिक न्याय भवनाची इमारत ही लोकांना न्याय देणारी इमारत झाली पाहीजे - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर लातूर,दि. 12: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची ही इमारत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारी इमारत झाली पाहीजे. याकरिता सर्व संबंधित विभागांनी व अधिका-यांनी शासकीय योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय दिला पाहीजे, असे प्रतिपादन कौशल्य विकास , कामगार कल्याण, भूकंप पूनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. लातूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ह्या शासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला, त्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर बोलत ...
- Get link
- X
- Other Apps
लातूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी शासन कटीबध्द आहे - पालकमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर लातूर,दि. 11: लातूर शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवर सिग्नलची आवश्यकता होती. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील 13 चौकांमध्ये ट्रॅफिक सिग्नल्स लावण्यात येणार आहेत. लातूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास, कामगार कल्याण, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले. ...
- Get link
- X
- Other Apps
शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात नियमितपणे सुसंवाद असावा - जिल्हाधिकारी लातूर,दि. 10: कृषि क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान व हवामानातील बदलांची माहिती सर्वसामान्य शेतक-यांना झाल्यास त्या बदलाच्या अनुषंगाने शेतकरी आपल्या पीक पध्दतीत बदल करुन भरघोस उत्पादन घेऊ शकतात . त्याकरिता शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यात नियमितपणे सुसंवाद असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी केले. मांजरा कृषि विज्ञान केंद्र येथे आत्मा व कृषि विज्ञान केंद्रामार्फत आयोजित शेतकरी व शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. पोले बोलत होते. यावेळी राज्य साक्षरता प...
- Get link
- X
- Other Apps
कारखानदारांनी औद्योगीक सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे - अपर जिल्हाधिकारी लातूर,दि. 9: प्रत्येकाचे जीवन हे महत्वाचे असते. त्यामुळे कारखान्यात काम करणारे कामगार व इतर लोकांच्या जीवीताला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची जबाबदारी संबंधित उद्योजकाची असते. त्यामुळे कारखानदारांनी औद्योगीक सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहीजे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डी.पी.डी.सी. सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय व एन. डी.आर. एफ. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कारखानदारांसाठी औद्योगीक सुरक्षा आणि ऑनसाइट आपत्तीकालीन आराखडा याबाबत कार्यशाळ...
- Get link
- X
- Other Apps
सर्व महिलांनी न्यूनगंड बाजूला ठेवून कार्यरत राहावे - जिल्हाधिकारी पांडुरंग पोले लातूर,दि. 8: समाजकारण, राजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान , शिक्षण यांसह इतर सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करुन आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटावित आहेत. तरि अशा महिलांचा इतर सर्व महिलांनी आदर्श समोर ठेवून न्यूनगंड न बाळगता काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले यांनी केले. आज दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त प्रशासनाचा जिल्हास्तरीय महिला दिनाचा कार्यक्रम डी. पी. डी. सी. सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी श्री. पोले बोलत होते. यावेळी जिल्हापुरवठा अधिकारी शोभा जाधव, प्रमुख पाहुण्या राजश्री शाहु महाविद्यालयाच्या प्राध्य...
- Get link
- X
- Other Apps
नितीमान समाजात ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण होते - अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर लातूर,दि. 8: ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी फक्त व्यापारी वर्गाचे प्रबोधन करुन चालणार नाही तर संपूर्ण समाजाचे प्रबोधन झाले पाहीजे. कारण नितीमान समाजामध्येच प्रत्येक ग्राहकांच्या हक्कांचे सरंक्षण होत असते, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर यांनी केले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील डी.पी.डी.सी. सभागृहात जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक हक्क व जबाबदा-या या विषय...
- Get link
- X
- Other Apps
पालकमंत्री श्री. निलंगेकर यांच्याकडून जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा लातूर,दि. 4: जिल्हा वार्षिक योजना सन 2016-17 अंतर्गत अखर्चित निधी, सन 2017-18 चा प्रारुप आराखडा व वाढीव मागणी नियोजन, जलयुक्त शिवार अभियानातील कामे, रस्ते विकास, तूर खरेदी, पीक विमा योजना, संभाव्य टंचाई, आरोग्य सेवा, कृषि, ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासनातील रिक्त पदे आदिंचा सविस्तर आढावा कौशल्य विकास व कामगार कल्याणमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेऊन संबंधीत यंत्रणांना मार्गदर्शक सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार सुधाकर भालेराव, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे, यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी व यंत्रणाप्रमुख उपस्थित होते. अखर्चित निधी ...