पालकमंत्र्यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या वारसाला  धनादेश प्रदान

         लातूर,दि. 3: निलंगा उपविभागीय कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय विकास कामांच्या आढावा बैठकीत निटूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. रमेश सोमवंशी यांच्या पत्नी शोभा रमेश सोमवंशी  यांना शासनाच्या आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या वारसांना  मदत निधी अंतर्गत  पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते 1 लाखाचा धनादेश देण्यात आला.
                 यावेळी नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले, उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, तहसिलदार श्री. देशमुख, श्री. कांबळे , नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, अरविंद पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. मोरे, निम्न तेरणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. चिस्ती यांच्यासह सर्व तालुका यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.
****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु